Latest

CWC Qualifier match : वेस्‍ट इंडिज विरुद्ध नेदरलँड सामना ठरला ‘रेकॉर्डब्रेक’, ‘या’ विक्रमांची नोंद

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वन-डे विश्‍वचषक पात्रता फेरीतील वेस्‍ट इंडिज विरुद्ध नेदरलँड यांच्‍यात झालेल्‍या सामन्‍यात अनेक नवे विक्रम नोंदले गेले. अत्‍यंत रोमहर्षक सामन्‍यात नेदरलँडने वेस्ट इंडीजवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या पराभवामुळे विश्‍वचषक पात्रतेसाठी वेस्‍ट इंडिजचा प्रवास आणखी खडतर झाला आहे. ( CWC Qualifier match) या सामन्‍यात कोणते पाच विक्रम नोंदले गेले हे जाणून घेवूया…

सर्वोच्च धावसंख्या असूनही सामन्‍याचा निकाल सुपर ओव्‍हरवर…

निकोलस पुरनच्या झंझावती १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३७४ धावा केल्‍या. जिंकण्‍यासाठी नेदरलँडसमोर ३७५ धावांचे लक्ष्‍य होते. अखेरच्या सहा चेंडूमध्ये नऊ धावांची आवश्यकता होती. नेदरलँडला अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर आठ धावा काढता आल्या. त्यामुळे सामना टाय झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये या लढतीचा निकाल लागला. सर्वोच्‍च धावसंख्‍या असूनही या सामन्‍याचा निकाल सुपर ओव्‍हरवर लागला. यापूर्वी २००८ मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील सामना ३४० धावा असूनही टाय झाला होता.

पाठलाग करताना वन-डेतील तिसरी सर्वोच्च धावसंख्या…

वन-डेमध्‍ये लक्ष्याचा पाठलाग करताना ३७४ ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरला आहे. हा सामना सुपर ओव्‍हरपर्यंत केला नसता तर एकदिवसीय सामन्यांमध्ये यशस्वीपणे पाठलाग केलेली ही दुसरी सर्वोच्च धाव ठरली असती. दक्षिण आफ्रिकेने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्‍या सामन्‍यात ४३५ धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला होता.

CWC Qualifier match : सर्वाधिक धावा झालेली सुपर ओव्हर…

या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये ३० धावा झाल्‍या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुपर ओव्‍हरमधील ही सर्वोच्‍च धावसंख्‍या ठरली आहे. यापूर्वी २००८ मध्ये पुरुषांच्या T20I मध्ये वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध २५ धावा केल्‍या होत्‍या. तर गेल्या वर्षी सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या महिला संघाने २५ धावा केल्या होत्या.

नेदरलँडच्‍या तेजा निदामनुरुचे झंझावती शतक

नेदरलँडच्‍या तेजा निदामनुरूने या सामन्‍यात झंझावती शतकी खेळी केली. नेदरलँडचा सर्वात वेगवान शतक झळकवणारा तो फलंदाज ठरला आहे. यावर्षी मार्च महिन्‍यात झिम्बाब्वेविरुद्ध हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये त्याने पहिले शतक झळकावले होते. त्याचे शतक हे नेदरलँड्ससाठी २०१५ नंतरचे दुसरे शतक देखील आहे. रायन टेन याच्‍यानंतर सर्वाधिक शतके करणारा तो नेदरलँडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

CWC Qualifier match : निकोलस पूरनचे वेस्ट इंडिजसाठी तिसरे जलद शतक

वेस्‍ट इंडिजच्‍या ब्रायन लाराने १९९९ मध्‍ये बांगलादेशविरुद्ध ४५ चेंडूत शतक झळकावले होते. तो वेस्‍ट इंडिजचा सर्वात वेगवान शतक झळकविणारा खेळाडू आहे. २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ख्रिस गेलने ५५ चेंडूत शतक फटकावले होते. निकोलस पूरने याने नेदरलँडविरोधात ६३ चेंडूत शतक झळकावले. वन-डे सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजसाठी हे तिसरे जलद शतक ठरले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT