Latest

Tomato Price : ‘बर्गर किंग’नेही टोमॅटो वापरणे बंद केले, कंपनीने सांगितले कारण…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोमॅटोच्या गगनाला भिडले आहेत. वाढत्या किंमतीने  मॅकडोनाल्ड आणि सबवे सारख्या ब्रँडना त्यांच्या बर्गर, पिझ्झा इत्यादींमधून टोमॅटो काढायला भाग पाडले आहे. त्याचवेळी, बर्गर किंग हे आणखी एक प्रसिद्ध नावही यात सामील झाले आहे. फास्ट फूड चेन बर्गर किंगने आपल्या खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला आहे. जाणून घ्या या मागील कारण. (Tomato Price )

बर्गर किंगची देशात सुमारे ४०० स्टोअर्स आहेत. कंपनीने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, "टोमॅटो पिकाच्या गुणवत्ता आणि कमी पुरवठा यामुळे आम्ही आमच्या खाद्यपदार्थामध्ये टोमॅटोतचा वापर करू शकत नाही." कंपनीने ग्राहकांना संयम बाळगण्याची विनंतीही केली आहे.

मॅकडोनाल्ड आणि सबवे इंडियाने केले  टोमॅटोचा वापर बंद 

 मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने देशाच्या काही भागात टोमॅटोचा किरकोळ भाव २०० रुपये किलोपर्यंत आहे. यामुळे सरकारला प्रथमच टोमॅटोची आयात करावी लागली आहे. भारत सध्या नेपाळमधून टोमॅटो आयात करत आहे. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत माहिती दिली की, देशांतर्गत बाजारात किमतीत विक्रमी वाढ होत असताना भारताने नेपाळमधून टोमॅटोची आयात सुरू केली आहे. जुलैमध्ये, फास्ट फूड चेन मॅकडोनाल्ड्सने सांगितले होते की, त्यांनी दर्जेदार उत्पादनांच्या अनुपलब्धतेचे कारण देत देशाच्या उत्तर आणि पूर्व भागातील त्यांच्या बहुतेक स्टोअरमध्ये अन्न तयार करण्यासाठी टोमॅटोचा वापर करणे बंद केले आहे. यासोबतच सबवे इंडियानेही प्रमुख शहरांमधील वाढत्या किमतीला तोंड देण्यासाठी टोमॅटोचा वापर बंद केला आहे.

Tomato Price : गगनाला भिडणाऱ्या किंमती

सरकारी आकडेवारीनुसार, टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी घाऊक किंमत १ ऑगस्ट रोजी घसरून 88.22 रुपये प्रति किलो झाली, जी एका महिन्यापूर्वी ९७.५६ रुपये प्रति किलो होती. त्याचप्रमाणे, टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत एका महिन्यापूर्वी ११८ रुपये प्रति किलोवरून आता 107 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT