Latest

#tokyo olympic: भालाफेकपटू नीरजचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क:  टोकिओ ऑलिम्पिक(#tokyo olympic) स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. #tokyo olympic ) भालाफेक स्पर्धेत आजवरच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'टोकिओमध्ये अभूतपूर्व इतिहास लिहिला गेलाय. आज जे साध्य केले ते कायम लक्षात राहील.

नीरजने अपवादात्मक आणि अद्वितीय कामगिरी केली आहे. नीरज उल्लेखनीय, उत्कटतेने खेळला आणि अतुलनीय धैर्य दाखवले. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणतात, 'नीरज चोप्राचा अभूतपूर्व विजय! तुझ्या सोनेरी भाल्याने इतिहास घडवला.

तुझ्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला प्रथमच भालाफेक प्रकारात पदक आणले.

तुमचा पराक्रम आपल्या तरुणांना नेहमी प्रेरणा देईल. भारत आनंदी आहे! तुमचे मनापासून अभिनंदन!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल नीरज चोप्रा याचे मनपूर्वक अभिनंदन!

भारतीय ॲथेलेटिक्समध्ये त्याने या शानदार सुवर्ण पदकाने नवा इतिहास लिहिला आहे.

काँग्रेस पक्षाने नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले असून ट्विटमध्ये म्हटले आहे, 'भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावणे ही आश्चर्यकारक कामगिरी आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ॲथलेटिक्समधील हे पहिले सुवर्णपदक आहे. नीरज तुझ्या या कामगिरीमुळे देशाला प्रचंड आनंद झाला असून तुझा अभिमान आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरजचे अभिनंदन केले असून ते म्हणतात, नीरजच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे भारताला सुवर्णपदक मिळाले. नीरजचे खूप अभिनंदन.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे, निराज तुझा आम्हाला अभिमान आहे.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अभिनंदन. आज संपूर्ण देशाला तुझ्या या गौरवशाली विजयामुळे आनंद झाला आहे. तुला खूप शुभेच्छा.

हेही वाचा: 

SCROLL FOR NEXT