Latest

नागपूर : उडता महाराष्ट्र होऊ देऊ नका, सरकारवर टीकास्त्र, विरोधकांची घोषणाबाजी

निलेश पोतदार

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा ललित पाटील मुद्यावर आज (सोमवार) विरोधकांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केले. राज्य सरकार ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवन परिसरात केला. 'उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र', 'सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्जची नशा', असे फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी 'ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध असो', 'उडता महाराष्ट्र करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', अशाही घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, 'शेजारी असलेल्या गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर येतात याचा अर्थ काय! त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ड्रग्जमाफिया कार्यरत आहेत. त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री या माफियांना संरक्षण देत आहेत. ललित पाटील या संपूर्ण प्रकरणातील छोटासा प्यादा आहे. वास्वतिक पाहता हे सरकार यासाठी जबाबदार असून, त्यांच्याद्वारे ड्रग्ज माफिया सक्रिय आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, रवींद्र धंगेकर, सतेज पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT