पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत कलह झाल्याने प्रभू राम बाहेर गेले होते. आता ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभू रामांचे अयोध्येत पुन्हा आगमन झाले आहे. प्रभू रामांनी जगातील कलह संपवून अयोध्येत आगमन केले. प्रभू रामांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकांने आपआपल्यात समन्वय राखून धार्मिक आचारण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ( Ayodhya Ram Mandir ) अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.२२) दुपारी १२.२९ वाजण्याच्या अभिजित मुहूर्तावर श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. त्यानंतर भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. (Ayodhya Ram Mandir)
मोहन भागवत म्हणाले की, "अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण आहे. देशातील घराघरात हे वातावरण पसरले आहे, सर्वत्र उत्साह संचारला आहे. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह जगभरात पोहोचला आहे."
आपल्याही सर्व वाद संपवायचे आहेत, प्रत्येकांने आपआपसांत समन्वयाने वागले पाहिजे. छोट्या छोट्या वादावरून भांडण तंटा करणे सोडून दिले पाहिजे. नागरिक अनुशासनचे पालणे करणे प्रत्येक कुटुंब, समाजात आवश्यक असून हीच खरी देशभक्ती आहे. आपल्यामध्ये सेवाभाव कायम राहिला पाहिजे. प्रत्येक नागरिकांमध्ये पवित्रता आणि संयम हवा, असेही भागवत म्हणाले.