Latest

Titanic Rare Footage : ‘टायटॅनिक’चे दुर्मीळ फुटेज आले समोर

Arun Patil

वॉशिंग्टन : 'कधीही न बुडणारे जहाज' अशी जाहिरात करून निघालेले 'टायटॅनिक' (Titanic Rare Footage) हे भव्य जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाले. 1912 मध्ये झालेल्या या दुर्घटनेवर आधारित 'टायटॅनिक' हा हॉलीवूडपट जगभर गाजला होता. आता या जहाजाचे आतापर्यंत कधीही न पाहिले गेलेले दुर्मीळ व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अतिशय भव्य व सुंदर असलेले हे जहाज शंभरांहून अधिक वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते. 'वुडस् होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशन' ने आता टायटॅनिकचे फुटेज (Titanic Rare Footage) प्रसिद्ध केले आहेत. हे फुटेज समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 3 किलोमीटर खाली शूट करण्यात आले होते. 1 सप्टेंबर 1985 मध्ये डब्लूएचओआय आणि फे्ंरच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांना कॅनडच्या न्यूफाऊंडलँडच्या आग्नेयेला दोन तुकड्यांमध्ये बुडालेले जहाज सापडले होते.

मात्र, आतापर्यंत या जहाजाची सर्व फुटेज सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केलेली नाहीत. त्याचा शोध लागल्यापासून, टायटॅनिकबद्दलच्या (Titanic Rare Footage) अनेक माहितीपटांमध्ये त्याचे काहीच फुटेज दाखवण्यात आले आहेत. तसेच त्याच्या मूळ डाईव्हच्या काही क्लिपदेखील प्रसारित करण्यात आल्या आहेत. परंतु, बुधवारी यू ट्यूबवर आजपर्यंत कोणीही न पाहिलेल्या फुटेजचा 80 मिनिटांचा मोठा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. 14 एप्रिल 1912 रोजी साऊथॅम्प्टन, इंग्लंड येथून न्यूयॉर्कपर्यंतचा पहिला प्रवास करताना हे जहाज हिमखंडावर आदळले. या दुर्घटनेत 1,500 हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन याच्या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या "टायटॅनिक" चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हे फुटेज प्रदर्शित करण्यात आले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT