पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अलिकडे जगणं खूप धावपळीचे झालं आहे,' हे वाक्य आपण दिवसभरात एकदा तरी म्हणतो. आधुनिक जगात धावपळ ही अपरिहार्य बाब बनली आहे. तुम्हाला माहित आहे का तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करता यावर तुमचा दिवस अवलंबून असतो. ( Morning Routine ) आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्यास आत्मविश्वास, शिस्त आणि मानसिक संतुलन असणारे व्यक्तिमत्व होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर कोणती कामे करावीत याविषयी जाणून घेवूया…
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचे झोपेचे गणित बिघडलेले आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खिळून राहायचे; मग झोपायचे आणि सकाळी उशिरा उठायचे असा क्रम अनेकांचा झाला आहे. पण, नियमित सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा
सल्ला आयुर्वेद देते. तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नसेस तर याचा सराव करा. हळूहळू तुम्ही सकाळी लवकर उठू लागला.
पहाटे ३ ते ६ ही वेळ भारतीय परंपरेनुसार ब्रह्म मुह्रूर्त म्हटले आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे हे सौंदर्य, बल, विद्या, स्वास्थ्य यांच्यासाठी आवश्यक आहे. ब्रह्म मुर्हुतावेळी वायू मंडलात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वांत जास्त असते. शुद्ध वायू मिळाल्याने मन आणि शरीर ताजेतवाने होते. सकाळी लवकर उठल्याने मेंदूतही सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहाते.त्यामुळेच सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिले आपल्या चेहर्या चांगले पानी मारा, डोळे बंद करुन पाण्याने चेहरा धुणे हाही आयुर्वेदामध्ये चांगला व्यायाम मानला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चेहर्यावर मारणारे पाणी हे अतिथंड किंवा अतिगरम असू नये. हे पाणी रुमच्या तापमाना एवढे असावे.
आयुर्वेदानुसार, सकाळी शरीरला तेलाने मालिश करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. मालीश करण्यासाठी कोणत्याही क्रिमपेक्षा खोबरेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला तर शरीरला उर्जा मिळते. तुम्ही रोजच्या धावपळीत दररोज मालिश करणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा तरी शरीरला मालिश करा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून दोन वेळा मालिश करावे असे आयुर्वेद सांगते. संपूर्ण शरीराला मालिश शक्य नसेल तर किमान पायाचे तळवे, डोके, कान, हात आणि कोपरे यांना तिळाच्या तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते.
तुमच्या दिवसाची सुरुवात ही व्यायामाने झाल्यास तुम्हा दिवसभर उर्जावान वाटते. सकाळी केलेल्या व्यायामामुळे शरीररातील रक्ताभिसरण सुधारते तसेच लवचीकपणाही वाढतो. त्यामुळे तुमच्या दिनक्रमात सकाळी व्यायाम आवश्यकच ठरतो. तुम्ही फिरायला जा किंवा योगासनेही करु शकता. मात्र सकाळी अतिश्रमाचा व्यायाम टाळा. व्यायाम आवश्यक आहे मात्र पूर्णपणे थकून जाणारा व्यायाम टाळा. सकाळी अति मेहनत टाळा. हलका व्यायामामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
सकाळी उठल्यानंतर अन्य महत्वाच्या गोष्टी केल्यानंतर न्याहारी (नास्टा) चुकवू नका. एक मात्र लक्षात ठेवा सकाळचा नास्टातील पदार्थ पचायला हलके असेच असावेत. तसेच भरपेटही नास्टा करु नका. नास्ट्यात हलके पदार्थ घ्या. यामुळे सकाळी तुमच्या पचनसंस्थेवर ताण येणार नाही. न्याहारीत फळ, हिरव्या पालेभाज्या, फळांचा रस यांचा समावेश करा.
हेही वाचा :