पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिपुरा विधानसभा निवडणूक प्रथमच लढविणार्या टिप्रा मोथा पक्षाने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला हा पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला होता. त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख झाली आहे. यंदाच्या विधानसभेत हा पक्ष काँग्रेस-डावे आघाडीला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. विशेष म्हणजे देववर्मा हे स्वत: निवडणूक रिंगणात नाहीत. मात्र पक्ष प्रमुख म्हणून त्यांची भूमिका त्रिपुराच्या राजकारणात लक्षणीय ठरली आहे.
त्रिपुराच्या राजेशाही घराण्यातील प्रद्योत देववर्मा हे पूर्वश्रमीचे काँग्रेचे नेते. २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांची त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्तीही झाली होती. मात्र काही महिन्यांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर भ्रष्ट लोकांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी स्वत:च्या पक्षाची स्थापन केली होती.
यंदाच्या निवडणुकीत टिप्रा मोथा या नवीन पक्षाने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस-सीपीआय (एम) युतीसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्रिपुराच्या राजेशाही घराण्यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख झाली आहे.आपणच राज्यात किंगमेकर ठरु, असा दावा करत होते. २०२१ मध्ये झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत टिप्रा मोथा यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले होते. त्यांनी ३० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. आता राज्यातील विधानसभेच्या ६० मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघ हे आदिवासी बहुल आहेत. टिप्रा मोथा पक्ष हा ४२ जागा लढवल्या आहेत. यातील १२ जागांवर टिप्रा मोथा पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
राज्यात बांगलादेशातील हिंदू स्थलांतरितांमुळे स्थानिक लोक आपल्याच जन्मभूमीत अल्पसंख्यांक झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे यांनी निर्माण केलेल्या आव्हानाला विरोधी पक्षाला हलक्यात घेवून चालणार नाही, असे राज्यातील राजकीय विश्लेषक स्पष्ट करत होता. आता निवडणूक निकालात आदिवासी बहुल ३० मतदारसंघांपैकी १२ ठिकाणी देववर्मा यांचा पक्ष आघाडीवर आहे. या पक्षाने सीपीएम आणि काँग्रेस आघाडीला काही मतदारसंघांत धक्का दिल्याचे मानले जाते.
हेही वाचा :