Tripura Assembly Election : विजयासाठी भाजपने केली त्रिपुरेश्वरी मातेची पूजा | पुढारी

Tripura Assembly Election : विजयासाठी भाजपने केली त्रिपुरेश्वरी मातेची पूजा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Tripura Assembly Election :त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान त्रिपुरात विजयी होण्यासाठी भाजपने त्रिपुरेश्वरी मातेला साकडे घातले आहे. भाजपच्या कार्यालयात आज सकाळी त्रिपुरेश्वरी मातेची पूजा करण्यात आली.

Tripura Assembly Election : “आम्ही आज पक्ष कार्यालयात पूजा केली आणि माता त्रिपुरेश्वरीचा आशीर्वाद घेतला. त्रिपुरात भाजप पुन्हा सत्तेवर येईल. आम्हाला बहुमत मिळेल,” असे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी यांनी मतमोजणीपूर्वी सांगितले.

त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभांचे निकालांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्रिपुरा विधानसभेसाठी 16 फेब्रुवारीला निवडणूक झाली, जिथे 28.14 लाख मतदारांपैकी 89.95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीपूर्व त्रिपुरात घेण्यात आलेल्या तीनही वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि त्याचा सहयोगी, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांना बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्रिपुरामध्ये ३५ जागा जिंकल्या होत्या. सीपीआय(एम) ने १६, आयपीएफटीने ८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप यापेक्षा खूप पुढे जात असल्याचे दिसत आहे.

Tripura Assembly Election : त्रिपुरात भाजपची 30 जागांवर आघाडी

त्रिपुरामध्ये ६० जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस-डावी आघाडी १५ जागांवर तर टिपरा ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

Back to top button