Latest

शिकाऱ्याची झाली ‘शिकार’ : वाघाने साळींदरावर हल्ला केला आणि…| Porcupine Kills Tiger

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : साळींदर हा प्राणी त्याच्या शरीरावरील लांबलचक काट्यांचा वापर शत्रू प्राण्याला घाबरवण्यासाठी करतो. पण वाघ आणि साळींदरच्या लढाईत वाघ मृत्युमुखी पडण्याची दुर्मिळ घटना त्रिपूर येथील एका जंगलात घडली आहे. मेलेल्या वाघाच्या पायात, गुडघ्यात साळींदरचे काटे मिळाले आहेत. तसेच वाघाच्या तोंडातही हे काटे मिळाले आहेत. (Porcupine Kills Tiger)

त्रिपूर जंगलातील अमरावथी या रेंजमध्ये ९ वर्ष वयाचा एक वाघ मृत स्थितीत मिळून आला. नियमानुसार या वाघाचे पोस्टमार्टेम करण्यात आले. या वाघाची साळींदरसोबत लढाई झाल्याचे यातून दिसून आले आहे. या वाघाच्या जबड्यातही साळींदरचे काटे मिळाले आहेत, यावरून वाघाने साळींदर खाल्ले असावे असे दिसते. शिवाय वाघाच्या पुढच्या पायावरही काट्यांमुळे जखमा झाल्याचे दिसून आल्या आहेत. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

या जखमांमुळे वाघ दुसरी शिकार करू शकला नाही, तसेच इतर काही खाऊ शकला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी किमान ३ दिवस तरी या वाघाने काहीच खाल्ले नव्हते, असेही दिसून आले आहे. या वाघाच्या शरीराची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT