Latest

Tiger 3 : टायगर 3 मध्ये असणार सलमान खानचा 10 मिनिटांचा एन्ट्री सीक्वेन्स!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – YRF स्पाय युनिव्हर्सच्या नवीन ऑफर टायगर 3 मध्ये सलमान खानचा 10 मिनिटांचा एंट्री सीक्‍वेन्स असणार आहे. दिग्दर्शक मनीश शर्मा यांनी खुलासा केला की, "सलमान खानने आम्हाला असंख्य संस्मरणीय इंट्रो सीन्स दिले आहेत. सलमानचे चाहते आणि सिनेप्रेमी ज्या क्षणांची वाट पाहत आहेत, त्यापैकी हा एक आहे. (Tiger 3) टायगर 3 मध्‍ये एंट्री करण्‍यासाठी आम्‍ही काहीतरी अनोखे, सलमान खानच्‍या स्‍टाईलमध्‍ये काही तरी करण्याची आवश्‍यकता होती!" (Tiger 3)

संबंधित बातम्या –

मनीष पुढे म्हणतो, "रविवारी यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहणे खूप रोमांचक असेल – मला आठवते की जेव्हा सलमान खान पडद्यावर येतो तेव्हा प्रेक्षक किती शिट्ट्या वाजवतात आणि टायगर 3 तेव्हा त्यांच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी मी थांबू शकत नाही. या रविवारी सिनेमागृहात येतोय!"

आदित्य चोप्रा निर्मित, टायगर ३ या रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण नंतर YRF स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे, जे सर्व ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

SCROLL FOR NEXT