Latest

Thunderstorm forecast: ‘या’ राज्यांमध्‍ये ढगफुटी सदृश्‍य पावसाचा अंदाज; गृह मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील बहुतांश राज्यात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, बदललेल्या हवामानामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. येत्या तीन दिवसांत उत्तर भारतातील पर्वतीय भागांत ढगफुटी सदृश्य पावसासह (Thunderstorm forecast) भूसख्खलनाची शक्यता आहे. त्यामुळे या पर्वतीय भागातील रहिवाशांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने सोमवारी (दि.२६) दिलेल्या बुलेटिननुसार, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश 'या' राज्यात पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा शक्यता आहे. दरम्यान, हिमालयीन मैदानी भागात शुक्रवार ३० जूनपर्यंत आणि डोंगराळ भागात गुरुवार २९ जूनपर्यंत अशीच स्थिती कायम राहणार (Thunderstorm forecast) असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

येत्या तीन दिवसांत काही ठिकाणी ढगफुटीसारख्या मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे.  तसेच उत्तर भारतातील डोंगराळ भागात भूस्खलन आणि पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथील लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आवाहन गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खाते आणि संबंधित राज्यांच्या संपर्कात (Thunderstorm forecast) गृह मंत्रालय  असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT