Latest

Thunderstorm : येत्या 3-4 तासात महाराष्ट्रातील ‘या’ शहरात गारपीटीची शक्यता

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : कोल्हापूरसह, धुळे, औरंगाबाद या शहरात येत्या 3 ते 4 तासात गारपीट Thunderstorm होण्याची शक्यता आहे, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे गडगडाट होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

आगामी दोन दिवस म्हणजे शनिवार व रविवारी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा या राज्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तेथे वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी राहणार असल्याने Thunderstorm सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह मध्य प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा व वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा विदर्भातून जात असल्याने तेथे वाऱ्याचा वेग जास्त आहे. मात्र याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होणार असून आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यात 8 व 9 एप्रील म्हणजे शनिवार व रविवारी राज्यात सावधानतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

Thunderstorm : कमाल तापमानात 3ते 4 अंशांनी घट होणार

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहिती नुसार संपूर्ण राज्यात 8 व 9 रोजी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊसाचा अंदाज आहे. त्यामुळे 40 अंशावर गेलेले राज्याचे तापमान कमी होऊन सरासरी 36 अंशावर येईल. पावसाचा जोर 9 एप्रिल नंतर कमी होईल. मात्र 13 एप्रिलपर्यंत राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT