Latest

दुर्दैवी घटना…! पुणे जिल्ह्यात तीन सख्ख्या भावडांचा खड्ड्यात बुडून मृत्यू

अमृता चौगुले

महाळुंगे इंगळे : पुढारी वृत्तसेवा : आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर गट नंबर २३२ मध्ये खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पडून ३ भावडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १२) घडली.

रोहित दास (वय ८), राकेश दास (वय ६) आणि श्वेता दास (वय ४) अशी मृत बालकांची नावे आहेत. बिहार येथील किशोर दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. ते पेंटर काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एकूण चार अपत्य आहेत. त्या पैकीच हे तिघे होते.

खेळता खेळता ही बालके घरा जवळच्या या मोकळ्या जागेत गेली होती. तेथे खणून ठेवलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात पडून साचलेल्या पाण्यात बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काही वेळानंतर वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात खळबळ उडाली.

घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस अधिकारी व कर्मचारी

घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी महाळुंगे पोलिस चौकीचे कर्मचारी दाखल झाले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय. सी. एम. रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलिस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT