Latest

Rohit Sharma : रोहितच्या टार्गेटवर तीन विक्रम

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माचा टी-20 संघात समावेश झाला आहे. रोहितने भारतासाठी अखेरची टी-20 मॅच 2022 मध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळली होती. आता अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेतून रोहित कमबॅक करणार आहे. या मालिकेत रोहितला 3 मोठे रेकॉर्ड करण्याची संधी असेल. (Rohit Sharma)

भारताच्या टी-20 संघातून तब्बल 14 महिने बाहेर असलेला रोहित शर्मा अखेर संघात परतला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाटी रोहित संघाचे नेतृत्व करेल. दोन्ही संघांमध्ये 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेत रोहितला 3 मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. हे विक्रम सध्या विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहेत. (Rohit Sharma)

सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार

रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार होण्याची संधी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 51 पैकी 39 सामन्यांत विजय मिळवला आहे. सध्या टी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. त्याने 72 पैकी 41 सामन्यांत विजय मिळवला आहे. जर टीम इंडियाने अफगाणिस्तानचा क्लीन स्वीप केला तर रोहित धोनीला मागे टाकू शकतो.

विराटला मागे टाकण्याची संधी

या मालिकेत रोहित शर्मा माजी कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीला मागे टाकू शकतो. टी-20 मध्ये भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने 50 सामन्यांत 1 हजार 570 धावा केल्या आहेत. तर रोहितच्या नावावर 51 सामन्यांत 1 हजार 527 धावा आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहितने 44 धावा केल्यास तो विराटला मागे टाकेल.

पहिला पुरुष क्रिकेटपटू

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहित सर्वात मोठा विक्रम करू शकतो तो म्हणजे पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 सामने खेळण्याचा विक्रम. पुरुषांच्या टी-20 मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 148 सामने खेळले आहेत. आता 150 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान रोहितला मिळू शकतो. अफगाणिस्तानविरुद्ध इंदूर येथे होणार्‍या लढतीत रोहित हा विक्रम करू शकतो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT