Latest

ओडिशामध्‍ये मालगाडी रूळावरून घसरली, प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना चिरडले; तीन ठार, दोन गंभीर

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील कोराई रेल्‍वे स्टेशनवर मालगाडीचा रूळावर घसरून मोठा अपघात झाला. आज (दि.२१) सकाळी ही दुर्घटना झाली. प्लॅटफॉर्म रेल्‍वे गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांवर मालगाडी  उलटली.  यामध्‍ये तीन प्रवासी ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.

आज सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मालगाडी रूळावरून घसरली. प्लॅटफॉर्मवर उभ्‍या असलेल्‍या प्रवाशांना चिरडत मालगाडीने तिकिट खिडकीला धडक मारली. भुवनेश्वरला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रेल्‍वे प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी या अपघातात जखमी झाले.

मालगाडीची एक बोगी वेगाने पलटी होत ब्रिजला धडकली. या अपघातानंतर कोसळलेल्‍या छताखाली अडकलेल्‍या लोकांना वाचवण्यासाठी इतर प्रवाशांनी धाव घेतली. यातील जखमी प्रवाशांना तातडीने रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT