Latest

कराड : इस्लामपूरजवळ अपघातात मलकापुरातील एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

backup backup

कराड ; पुढारी वृत्तसेवा : अल्टो कारमधून मलकापूर (ता. कराड) येथून इस्लामपूरच्या दिशेने निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पेठनाका परिसरात पेठ – सांगली मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

दरम्यान, या अपघातात एका चिमुकलीसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मलकापूरमधील पोळ वस्ती परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पोळ कुटुंबातील पाच व्यक्ती कारमधून प्रवास करत होत्या.

प्रवास करत असताना समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ कुटुंब प्रवास करत असलेली कार या वाहनासह पाठीमागून येणाऱ्या वाहनाच्या मध्यभागी सापडले. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मात्र असे असले तरी अपघाताची पूर्ण माहिती समोर येऊ शकलेली नाही.

SCROLL FOR NEXT