Latest

Mumbai Police | २६/११ सारखा हल्ला करु, पीएम मोदी टार्गेटवर, मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमुळे खळबळ

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आज (दि.१८ जुलै) धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजद्वारे पुन्हा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा; अशी धमकी वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरू (Threat Message) करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळालेल्या या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच केंद्र सरकार निशाण्यावर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. ही धमकी दिल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम ५०९ (२) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल (Threat Message) करण्यात आला आहे.

Threat Message : यापूर्वी देखील धमकीचा मेसेज

यापूर्वी या वर्षी 22 मे रोजी देखील मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने मुंबईत लवकरच स्फोट घडवणार असल्याचे लिहिले होते. या धमकीच्या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. (Threat Message) याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT