मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तंत्र शिक्षण विभागातर्फे घेण्यात प्रवेश परीक्षेला (CET) बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेला हजर राहता आलेलं नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल, अशी माहिती माहिती व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मागील दोन दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झालेली आहे. नेमक्या याच कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी देता आली नाही.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सीईटीची परीक्षा पुन्हा देण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. याबाबतच्या नव्याने तारखा जाहीर करण्याच येतील. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काळजी करू नये, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.