Latest

माफिया सरकारसमोर कधीच नमणार नाही : किरीट सोमय्या

सोनाली जाधव

 पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्‍यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माफिया सरकार आहे, माफिया सरकारसमोर कधीच नमणार नाही, असे विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केले. साेमय्‍या यांच्‍या वाहनावर शनिवारी रात्री हल्‍ला झाला हाेता. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्‍यासाठी ते दिल्लीत रवाना झाले. यापूर्वी ते माध्‍यमांशी बाेलत हाेते.

किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. यात किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकार व पोलिस प्रशासनाच्‍या भूमिकेवर प्रश्‍न उपस्‍थित केले. या प्रकरणाची माहिती देण्‍यासाठी केंद्रीय गृह सचिव यांची भेट घेणार आहेत. सोमय्या म्हणाले, शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसतात. हे माफिया सरकार आहे. किरीट सोमय्या माफिया सरकारसमोर नमणार नाही. माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा  तपास झाला पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.   

किरीट सोमय्यांसह भाजप शिष्टमंडळ दिल्‍लीला रवाना 

किरीट सोमय्या मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या भाजप शिष्टमंडळ आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ. राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आदींचा समावेश आहे. ते नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना भेटणार आहेत.
हेही वाचलंत का? 
SCROLL FOR NEXT