Latest

१५ कोटींचा दुर्मिळ हिरा…२१ वर्ष न्‍यायालयीन लढाई आणि ‘फेलुदा’ ट्विस्ट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ही गोष्‍ट आहे एका तब्‍बल १५ कोटी रुपये किंमत असणार्‍या ३२ कॅरट दुर्मिळ हिर्‍याची (rare diamond)  झालेल्‍या चोरीची. त्‍यानंतरच्‍या थरारक तपासाची. या प्रकरणी तब्‍बल २१ वर्ष चाललेली न्‍यायालयीन लढाई नुकतीच संपली. सत्र न्‍यायालयाच्‍या न्‍यायमूर्तींनी या प्रकरणाची तुलना सत्यजित रे यांच्या प्रसिद्ध गुप्तहेर कथा 'जॉय बाबा फेलुनाथ'शी करत मूळ मालकाकडे हा हिरा सोपवला. एका रहस्‍यपटासारखी कथा असणार्‍या या या घटनेविषयी जाणून घेवूया…

rare diamond : २१ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

प्रणव कुमार रॉय हे दक्षिण कोलकाता येथील रहिवासी. त्‍यांच्‍याकडे ३२ कॅरेटच्‍या गोलकोंडा हिरा होता. त्‍यांना या हिर्‍याची नेमकी किंमत किती होते हे जाणून घेवचे होते. यासाठी ते ज्‍वेलर्सच्‍या शोधात होते. जून २००२ मध्‍ये हिरे विक्री आणि खरेदी करत असल्‍याचे सांगून इंद्रजित तापदार हा प्रणव कुमार रॉय यांच्‍या घरी आला. सोन्याच्या अंगठीत ठेवलेला हिरा ज्‍या प्रकारे तापदार हाताळत होता यावरुनरॉय यांना संशय आला. त्‍यांनी हिरा परत करण्याची विनंती केली. यावेळी तापदारने पिस्तूल काढले आणि हिरा त्याच्या साथीदाराकडे दिला. रॉय आणि तापदार यांच्यात हाणामारी झाली, त्यादरम्यान दुसऱ्या व्यक्तीने रॉयला रोखले. त्यानंतर ही जोडी हिरा घेऊन पळून गेला, अशी तक्रार रॉय यांनी पोलिसांकडे दिली होती.

दुर्मिळ हिरा सापडला इलेक्‍ट्रीक स्विचबोर्डमध्‍ये!

रॉय यांच्‍या तक्रारीची कोलकाता पोलिसांनी गंभीर दखल घेतली. त्‍यांनी हिर्‍याचा शोध घेतला. मात्र त्‍यांना अपयश आले. आरोपीने घरातून पळून जाताना हिरा रॉय यांच्‍याच घरात हिरा कुठेतरी लपवून ठेवला असावा, असा पोलिसांना संशय होता. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तापदार यांच्‍या घर त्वरीत शोधून काढले. मात्र, अनेक शोध घेऊनही त्यांना हिरा सापडला नाही. पोलिसांनी नव्याने शोधाशोध सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर, पोलिसांनी एका जिन्याच्या खाली असलेल्या मीटर बॉक्सजवळ स्विचबोर्डच्या पोकळीत हा १५ कोटी रुपयांचा दुर्मिळ हिरा आढळला. पोलिसांनी तो जप्‍त केला.

न्‍यायमूर्तींनी घटनेशी केली 'फेलुदा'चा ट्विस्टशी तुलना

१५ कोटी रुपयांच्या ३२ कॅरेटच्या गोलकोंडा हिऱ्यावर २१ वर्षे चाललेली कायदेशीर लढाई अखेर कोलकाता शहर सत्र न्यायालयात संपली. पोलिसांनी ज्या पद्धतीने हिरा जप्त केला त्याची तुलना न्यायमूर्ती आनंद शंकर मुखोपाध्याय 'फेलुदा' ट्विस्टचे स्‍मरण करत या घटनेची तुलना सत्यजित रे यांच्या प्रसिद्ध गुप्तहेर कथा 'जॉय बाबा फेलुनाथ'शी केली.  ही घटनाही तशीच आहे. येथे फक्‍त इलेक्‍ट्रिक बोर्डमध्‍ये हिरा सापडला, असे सांगत न्‍यायमूर्तींनी हिरा मूळ मालक प्रणव कुमार रॉय यांच्‍याकडे सोपवला. जगविख्‍यात चित्रपट दिग्‍दर्शक सत्‍यजित रे यांच्‍या चित्रपटात मौल्यवान वस्तू दुर्गा मूर्तीवरील सिंह शिल्पाच्या तोंडात ठेवल्‍याचे दाखवण्‍यात आले होते. चित्रपटातील रहस्‍य हे प्रेक्षकांसाठी एक धक्‍कातंत्र ठरले हाेते. प्रेक्षकांना हे एवढं पसंद पडले की रहस्‍यमय घटनांना 'फेलुदा' ट्विस्ट असे म्‍हटले जावून लागले.

rare diamond : आरोपीची शिक्षा कायम

मागील आठवड्यात शहर सत्र न्यायालयाने प्रणव कुमार रॉय यांना ट्रायल कोर्टाने विशिष्ट अटींनुसार हिरा ताब्यात ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी हिऱ्याचे मूळ स्‍वरुप बदलू नये, अशी अट ठेवली. तसेच त्‍यांना न्‍यायालयात दोन कोटी रुपयांचा बाँडही सादर करावा लागला. या प्रकरणी कनिष्‍ठ न्‍यायालयाने ट्रायल कोर्टाने आरोपी तापदारला दोषी ठरवले होते. त्‍याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तापदार याने याला आव्‍हान दिले. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शहर सत्र न्‍यायालयाने शिक्कामोर्तब करून तापदार याची शिक्षा कायम ठेवली आहे.

३२ कॅरेटचा गोलकोंडा दुर्मिळ हिरा

प्रसिद्ध हिरे तज्ञ आणि बंगाल ज्वेलरीचे नियुक्त भागीदार शुभदीप रॉय यांनी सांगितले की, 32-कॅरेट गोलकोंडा हिरा हा दुर्मिळ आहे.तो गोलकोंडा या जगातील सर्वात जुन्या खाणींपैकी एक खाणीत सापडेला हिरा आहे. याची तुनला जगप्रसिद्‍ध हीरा कोहीनूर आणि शाहजहान हिऱ्यांसोबत होते, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT