Latest

थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे पठाणकोटमध्‍ये शहीद

अनुराधा कोरवी

शिरुर अनंतपाळ; पुढारी वृतसेवा:

तालुक्यातील थेरगाव येथील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे (वय ३५ वर्षे) हे पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणी परिसरात (कैंटोनमेट) आज सोमवारी (दि.२७) रोजी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचे पार्थिव उद्या मंगळवारी (दि.२८) त्यांच्या मूळ गावी आणले जाणार असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. सूर्यकांत यांच्या निधनाची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून सूर्यकांत तेलंगे यांना आदरांजली वाहिली आहे.

सूर्यकांत तेलंगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील श्री. प्रेमनाथ विद्यालयात तर बारावीपर्यंतचे शिक्षण रापका येथील लोकजागृती विद्यालयात झाले होते. सूर्यकांत याच्या वडील दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करतात. आई रोजंदारीवर कामाला जाते.

सूर्यकांत यांनी कै. रवींद्र करिअर ॲकडमी पोलादपूर महाड येथे भरती पूर्व प्रशिक्षण घेतले होते. रायगड येथे २००७ मध्ये ते सैन्य दलात भरती झाले होते. २०१४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT