Latest

सातारा : मतदानासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे टोलनाके जॅम

अविनाश सुतार

सातारा (लिंब); पुढारी वृत्तसेवा :  राज्यात अनेक ग्रामपंचायत निवडणुकासाठी आज ( दि. १८) अत्यंत चुरशीने होत आहेत. कामानिमित्त बाहेरगावी असेलेल्या चाकरमान्यांना मतदानासाठी गावी बोलावले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी गावी जाणाऱ्या चकरमान्यांच्या गर्दीमुळे टोलनाके जॅम झालेले पाहायला मिळत आहेत.

सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा मतदानाचा दिवस असल्याने पुणे, मुंबई सह मोठ्या शहरातील मतदार आपला निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपापल्या गावी परतत आहेत. गावाकडे जाण्यासाठी पुणे – बंगलोर महामार्ग हा जवळचा आणि चांगला रस्ता असल्याने या चाकरमानी मतदारांच्या गाड्या रविवारी सकाळपासून महामार्गावरून धावताना दिसत आहेत.

आज सकाळी वाहनांची संख्या मोठी असल्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होत्या. त्यामुळे टोलनाके जॅम झाल्याचे चित्र दिसत होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT