Latest

Valuable Stone : ऑस्ट्रेलियात सापडला 460 कोटी वर्षांपूर्वीचा दगड, सोन्यापेक्षाही अत्‍यंत मौल्यवान

Arun Patil

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील एक महत्त्वपूर्ण शहर असलेल्या मेलबर्न पसिरातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मैरिबोरो रिजनल पार्क. डेविड होल नामक एक संशोधक येथे आपल्या मेटल डिटेक्टरने मौल्यवान वस्तू आणि खजिन्याचा शोध घेत होता. याच प्रयत्नात त्याला एक लाल रंगाचा अत्यंत वजनदार दगड सापडला. (Valuable Stone) या दगडात पिवळे पिवळे ठिपके दिसत होते. याशिवाय त्याच्याभोवती पिवळी मातीही जमा झाली होती. यामुळे डेविडला हा एक सोन्याचा दगड असू शकतो, असे वाटले.

 मैरिबोरोला सोन्याच्या खाणींचा भाग म्हणून ओळखले जाते. 19 व्या शतकात येथे सोन्याच्या मोठ-मोठ्या खाणी होत्या. आजही काही वेळे येथे सोन्याचे लहान मोठे दगड सापडतात. याच भागात शोध घेत असताना डेविड होलच्या हाती एक मोठा खजिनाच सापडला. डेविडने या वजनदार दगडाला फोडण्याचा तसेच कापण्याचा प्रयत्न केला, पण तो दगड तुटलाच नाही. त्यानंतर डेविडने दगडावर अ‍ॅसिड ओतून पाहिले; मात्र अ‍ॅसिडचा दगडावर कसलाच परिणाम झाला नाही. खरे तर डेविडला तो दगड सोन्याचा वाटत होते, मात्र तो सोन्याचा नव्हताच.

Valuable Stone : दगड एक दुर्मीळ उल्कापिंड

काही वर्षांनंतर डेविडने त्या दगडाला मेलबोर्न म्युझियममध्ये नेले. तेथे त्या दगडाचा अभ्यास केला असता असे समजले की, तो दगड एक दुर्मीळ उल्कापिंड होता. ज्याची कोण किंमतच करू शकत नाहीत. कारण या दगडात जे धातू होते, ते पृथ्वीवर सापडतच नाहीत. दरम्यान, दगडाचा अभ्यास केला असता तो 17 किलोचा असून सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले. हा दगड कापण्यासाठी डायमंडचा वापर करावा लागला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT