Latest

झाडांमधून येतोय किर्रर्र आवाज! ‘सिकाडा’ देतोय टीप टीप पावसाचे संकेत

अंजली राऊत


नाशिकमधील गोदापार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून झाडांमधून येणारा किर्रर्र आवाज हा रातकिड्यांचा नसून तो सिकाडा या कीटकाचा असून, हा कीटक दाट जंगलात आढळतो. जंगलात याचा आवाज मे महिन्यात ऐकण्यास मिळतो. आता चक्क शहरातदेखील हा आवाज ऐकायला मिळत असून, सिकाडाचा किरकिराट विणीच्या हंगामात मादीला साद घालण्यासाठी सुरू असतो. त्याचा आवाज जसजसा वाढतो तसे तापमान वाढते व पाऊस लवकर येण्याचा संकेतदेखील तो देतो. या कीटकाचे वैशिष्टय म्हणजे प्रौढावस्थेतील या कीटकाचे आयुर्मान फार अल्प असते. काही वेळा मादीसोबत मिलनानंतर नर सिकाडा गतप्राण होतो.

मुंबईतील तरुण संशोधकांनी 'सिकाडा'च्या पाच प्रजाती वर्षापूर्वी शोधून काढल्या आहेत. जैविक अन्नसाखळीत 'सिकाडा' कीटकाला महत्त्वाचे स्थान आहे. पक्षी आणि सरपटणाऱ्या जीवांच्या भक्ष्यामध्ये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 'सिकाडा'विषयी भारतामध्ये पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही. जैविक अन्नसाखळीत 'सिकाडा' कीटकाला महत्त्वाचे स्थान असून, वृक्षतोड, मातीची झीज आणि शहरीकरण हे सिकाडाच्या अधिवासाला घातक असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करीत आहे. या कीटकाचे वर्णन कला आणि साहित्यातदेखील बघावयास मिळते.

होमरच्या इलियडच्या काळापासून आणि चिनी शांग राजवंशमधील सजावटीच्या कलेतील आकृतिबंध म्हणून सिकाडास साहित्यात वैशिष्ट्यकृत केले गेले आहेत. त्यांच्या ध्वनी निर्मितीच्या यंत्रणेचा उल्लेख हेसिओडने त्याच्या " वर्क्स अँड डेज " या कवितेमध्ये केला आहे. तसेच अर्जेंटिनियन कवयित्री आणि संगीतकार मारिया एलेना वॉल्श यांनी लिहिलेल्या "कोमो ला सिगारा" ("लाइक द सिकाडा") या निषेध गीतामध्ये सिकाडाचे वर्णन आहे. गाण्यात, सिकाडा हे जगण्याचे आणि मृत्यूच्या विरोधाचे प्रतीक आहे. इतर लॅटिन अमेरिकन संगीतकारांसह मर्सिडीज सोसा यांनी हे गाणे रेकॉर्ड केले होते .

सिकाडा हे कीटक होमोप्टेरा गणातील कीटक असून, बहुतेक जाती सिकाडिडी कुलातील आहेत. परंतु टेट्टिगॅरेटिडी कुलाच्या दोन केसाळ जाती ऑस्ट्रेलिया व त्याच्या दक्षिणेस टास्मानियात आढळतात. हे मध्यम ते मोठ्या आकारमानांचे कीटक असून, त्यांच्या शरीराची लांबी सामान्यपणे २-५ सेंमी. असते. सिकाडांची जास्तीत जास्त लांबी १५ सेंमी. पर्यंत असते. पंखांच्या दोन जोड्या असून, पंखांमध्ये अनेक शिरा असतात. बहुतेकांचा रंग सौम्य वा गडद असून पंख सुंदर असतात.

नराकडून ध्वनिनिर्मिती
सिकाडा कीटकांत फक्त नरामध्ये ध्वनी निर्माण करणारा वैशिष्ट्यपूर्ण अवयव असतो. त्याच्या उदराच्या तळावर ढोलकीसारख्या त्वचेच्या दोन रचना असतात. या पटलासारख्या रचनांना टिंबल म्हणतात. या टिंबलांच्या कंपनाद्वारे मोठा आवाज निर्माण होतो. टिंबलाचे पातळ पटल लहान स्नायूच्या मदतीने जलदपणे आतबाहेर होऊन कंप पावते आणि आवाज निर्माण होतो.

जमिनीत पाणीगाळप प्रक्रियेत सुधार
​सिकाडा हा कीटकांच्या साम्राज्यातील राजा आहे. याचा आकार. निसर्गाच्या अन्नसाखळीत देखील सिकाडा खूपच महत्त्वाचा आहे. सरपटणारे प्राणी, पाली, सरडे, पक्षी यांचे आवडते खाद्य म्हणजे सिकाडा. ज्या भागात तुम्हाला सिकाडाचा आवाज मोठ्या प्रमाणात येईल तो तो भाग पर्यावरणीयदृष्ट्या समृध्द आहे असे समजावे. सिकाडा हे पक्षी आणि इतर भक्षकांसाठी एक मौल्यवान अन्न स्रोत आहेत. सिकाडा हिरवळीचे वायू बनवू शकतात आणि जमिनीत पाणी गाळण्याची प्रक्रिया सुधारू शकतात. सिकाडा कुजताना मातीत पोषक तत्त्वे देखील जोडतात.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT