कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिन अभिवादनासाठी सकाळी १० वाजता सर्वांनी १०० सेकंद स्तब्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोल्हापूरवासियांनी जिथल्या तिथे सर्व व्यवहार थांबवत मुख्य चौक, रस्ते स्तब्ध होत महाराजांना आदराजंली वाहिली.
कोल्हापूरवासियांनी याची सर्व तयारी केली होती. आज शुक्रवारी (दि. ६) रोजी सकाळी ९.५५ पासूनच जागोजागी लोकांची गर्दी होवू लागली होती. तालीम संस्था, बस थांबे, रिक्षा थांबे, दुकानांसमोर लोक एकत्रित येवू लागले. तर सकाळी १० वाजण्याच्या आधीच सर्व वाहने, चौक, रस्ते शाहू महाराजांना आदराजंली वाहण्यासाठी स्तब्ध झाले. उत्स्फुर्तपणे लोकांनी सर्व व्यवहार थांबवून आपल्या लोकराजाला मानवंदना वाहिली.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता १०० सेंकद स्तब्धता राखून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी अधिवादन करण्यात येणार होते. पावणे दहापासूनच चौकांचौकात, रस्त्यांवर, दुकानांमध्ये याची चर्चा सुरु होती. ९ वाजून ५५ मिनीटांपासूनच लोक एकत्रित येणास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी चौकात केएमटी बस थांब्यावरील वाहतूक नियंत्रकांसह प्रवासी उभे राहिले. तसेच रिक्षा स्टॉपवरील सर्व चालकही चौकात थांबले होते. तब्बल ५ मिनिटांहून अधिकवेळ उभे राहून या सर्वांनी शाहूराजांना मानवंदना दिली. यावेळी चौकातून जाणारी वाहनेही जिथल्यातिथे थांबली होती. चारही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
हेही वाचलंत का?