Latest

Dinosaur Eggs | ‘कुलदेवता’ समजून ज्याची वर्षांनुवर्षे केली पूजा ‘ती’ निघाली डायनासोरची अंडी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मानला तर देव नाहीतर दगड' असं म्हणतात; पण मध्य प्रदेशातील धारमध्ये लोक ज्या दगडाला कुलदेवता म्हणून पूजत होते ते डायनासोरचं अंड (Dinosaur Eggs) निघालं. शास्त्रज्ञांनी तपास केल्यानंतर हे सत्य बाहेर आले असून तेथील लोकांना धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या : 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पंडालय गावातील वेस्ता मांडलोई कुटुंब हे या गोलाकार दगडाची (Dinosaur Eggs) 'काकर भैरव' म्हणून पूजा करत होते. ही परंपरा त्यांच्या पूर्वजांपासून सुरू होती. ही कुलदेवता शेती आणि गुरेढोरे यांचे रक्षण करते आणि त्यांच्या कुटुंबाला संकटांपासून वाचवते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

'काकर' म्हणजे शेती आणि 'भैरव' म्हणजे देवता. मांडलोई यांच्याप्रमाणेच, त्यांच्या गावातील अनेक लोक अशा दगडाच्या मूर्तींची (Dinosaur Eggs) पूजा करतात. जे त्यांना धार आणि आसपासच्या परिसरात शेती करताना सापडले आहेत. मात्र, आता नवीन तथ्ये समोर आल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. काही लोक मात्र या वस्तू आजपर्यंत देवता म्हणून पूजत होता आणि यापुढेही पूजा करणार असल्याचे सांगतात.

असा झाला खुलासा?

लखनौ येथील बिरबल साहनी पुरातत्व संस्थेचे शास्त्रज्ञ डायनासोरचे अवशेष शोधण्यासाठी मध्य प्रदेशातील धार येथे गेले होते. धार या परिसरात गेलेल्या त्यांच्या टीमला तेथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात गोलाकार वस्तू सापडल्या होत्या. ज्याची अनेक वर्षे पूजा केली जात असल्याचे समजले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्याची तपासणी केली असता त्यांना ते डायनासोरची अंडी असल्याचे समजले.

यापूर्वीही सापडली आहेत अंडी

एकेकाळी मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात पृथ्वीवरून नामशेष झालेल्या डायनासोरची संख्या अधिक होती. या वर्षी जानेवारी महिन्यातही धारमध्ये २५६ अंडी सापडली होती. त्यांचा आकार १५ ते १७ सेमी इतका होता. असे मानले जाते की डायनासोर ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहत होते. तेव्हा मानवाची उत्पत्ती झाली नव्हती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT