Latest

Oscars २०२३ : आरआरआर ते कांतारा… ; ऑस्करसाठी २५ जानेवारीला नामांकनाची अंतिम यादी होणार जाहीर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्करने ( Oscars २०२३ ) जगभरातील ३०१ चित्रपटांच्या नामांकनाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात 'अवतार- द वे ऑफ वॉटर', 'कांतारा', 'गंगूबाई काठियावाडी', 'द कश्मीर फाईल्स', 'मी वसंतराव', 'तुझ्यासाठी काहीही' या चित्रपटाच्या नावांचा समावेश रिमाइंडर यादीत झाला आहे. ऑस्कर नामांकनाची अंतिम यादी २५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Oscars २०२३ यादीत 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या नावाचे नामांकन झाल्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. यात त्यांनी 'द कश्मीर फाईल्स हा चित्रपट ऑस्कर २०२३ च्या पहिल्या यादीमध्ये समावेश झाला आहे. हा भारतातील पाच चित्रपटांपैकी एक आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. हे वर्ष भारतीय सिनेमासाठी अत्यंत खास आहे.' असे म्हटले आहे.

याच दरम्यान यंदाच्या ऑस्करसाठी भारताकडून 'द छेल्लो' शो हा गुजराती चित्रपट अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविण्यात आला आहे. टीव्ही स्टार जिमी किमेल यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे या सोहळ्यात कोण बाजी मारणार? याकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे. तर ९५ वा अकादमी पुरस्कार १२ मार्च २०२३ रोजी लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT