नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या ६ दिवसांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात १ हजार ६७५ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान १ हजार ६३५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.४१ टक्के नोंदवण्यात आला. देशातील ४ कोटी २६ लाख ७३७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १४ हजार ८४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ४९० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
देशात कोरोनाविरोधात (corona) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९२ कोटी ५२ लाख ७० हजार ९५५ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.३० कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ३१ लाख ४८ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १६ कोटी ३० लाख १७ हजार ४६० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ७४ लाख ९९ हजार ८५२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ७ हजार ६२६ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?