Latest

वळसे पाटील म्हणाले, “झेड सुरक्षा असणारे सोमय्या कुठे आहेत, केंद्राला विचारणार”

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : "शरद पवारांच्या घरावर झालेले आंदोलन नव्हतं तर ते जाणीवपूर्वर हल्ला होता. पोलीस चौकशी करत आहेत, त्यावर आताच बोलणं योग्य होणार नाही. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर 'नॉट रिचेबल' झाले आहेत. तर झेड सुरक्षा असलेले किरीट सोमय्या कुठे आहेत, यासंदर्भात केंद्राला विचारणा करणार आहे", अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

गृहमंत्री वळसे पाटील माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "'दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि स्वत:वर आरोप झाले की चौकशीला सामोरं जायचं नाही, हे काही शूरपणाचं लक्षण नाही", असा टोला वळसे पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते अटकेत आहेत.

याबाबतही गृहमंत्र्यांनी म्हणाले की, "शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रीतसर चौकशी सुरू आहे, जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती पोलीस न्यायालयात देत आहेत. हे प्रकरण न्यायालयात असल्याने जास्त माहिती उघड करणं योग्य नाही. मात्र गुप्तचर यंत्रणेनं पत्र लिहून हल्ल्याची कल्पना दिली असतानाही योग्य ती काळजी घेतली नाही, त्यामुळे याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे", अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर विरोधा पक्षांकडून जोरदार आरोप होत आहे. त्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारही भाजपाविरुद्ध आक्रमक झालेली दिसून येत आहे. शिवसेनेचा खासदार यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात आपले जोरदार टीका करताना दिसत आहेत. तर किरीट सोमय्या आता आपल्याला जामीन मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT