Latest

Aadhaar card : आधार कार्ड संदर्भातील ‘तो’ इशारा केंद्र सरकारने घेतला मागे

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आधार कार्डची  (Aadhaar card) छायांकित प्रत कोणालाही देऊ नका, कारण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असा इशारा केंद्र सरकारने नागरिकांना दिला होता. मात्र, याच्या दोन दिवसांतच सरकारने याबाबतची मार्गदर्शक तत्वे मागे घेतली आहेत. छायांकित प्रत देण्याऐवजी आधारची केवळ चार आकडे असलेली मास्कड (मुखवटा) कॉपी देण्याचा सल्ला सरकारने लोकांना दिला होता.

आधारकार्ड  (Aadhaar card) वापराच्या संदर्भात केंद्र सरकारने गत शुक्रवारी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यात कोणत्याही संस्थेला आधारकार्डची छायांकित प्रत अर्थात फोटोकॉपी देऊ नये, असे सांगण्यात आले होते. हॉटेल्स किंवा चित्रपटगृहांना आधारकार्डची प्रत घेण्याचा अधिकार नसल्याचेही इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने आदेशात नमूद केले होते. तथापि हा इशारा दिल्याच्या दोन दिवसातच मार्गदर्शक तत्वे मागे घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचलंत का ?  

SCROLL FOR NEXT