केज ; पुढारी वृत्तसेवा केज बाजारसमितीच्या 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवत भाजपचे रमेश आडसकर व आ नमिता मुंदडा गटाने आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना चार जागेवर समाधान मानावे लागले आहे. केज बाजार समितीच्या 15 जागांकरिता 28 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आज (शनिवार) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शिक्षक पतपेढी या ठिकाणी मतमोजणीस सुरुवात झाली.
यात सेवासहकारी सोसायटीच्या 11 पैकी 11 जागांवर रमेश आडसकर व आ नमिता मुंदडा गटाचे सर्वच उमेदवार 150 हून अधिक मतांनी विजयी झाले, तर ग्रामपंचायतच्या गटातून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या गटाने 4 पैकी चार जागांवर विजय मिळवला आहे.
यापूर्वीच 3 जागांवर आडसकर व मुंदडा गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने बाजारसमितीच्या 18 पैकी 14 जागा ताब्यात घेत त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बाजारसमितीच्या स्थपनेपासूनच यावर कायम आडसकर कुटुंबाचे वर्चस्व राहिलेले आहे.
हेही वाचा :