Latest

Forbes New Deal : अबब! ‘या’ 28 वर्षीय तरुणाने ‘फोर्ब्स’मध्ये गुंतवले साडेसहा हजार कोटी! मिळवली 82% भागिदारी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : लुमिनार टेक्नोलॉजीचे सीईओ ऑस्टिन रसेल यांनी जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाच्या प्रकाशन कंपनीची ८२% भागीदारी विकत घेतली आहे. ग्लोबल मीडिया असे या प्रकाशन कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे ८२% शेअर्स त्यांनी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या २८ वर्षांच्या या तरुणाने जवळपास ८०० डॉलरची (साडेसहा हजार कोटी) गुंतवणूक केल्याने याची खूपच चर्चा होत आहे. या आर्थिक व्यवहारानंतर फोर्ब्स कंपनीच्या मूळ मालकाकडे केवळ १८% भागीदारी शिल्लक राहिली आहे. द वॉलस्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिलेली आहे. (Forbes New Deal)

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, फोर्ब्स अमेरिकन मीडिया, तंत्रज्ञान आणि एआय तज्ञांसह (AI) एक नवीन मंडळ नियुक्त करण्याची योजना त्यांनी बनवली आहे. याशिवाय, फोर्ब्स मीडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स यांचे कंपनीमधील स्थान अबाधित राहील असे नमुद करण्यात आले आहे. तसेच रसेल यांची कंपनी फोर्ब्स मासिकाच्या किंवा कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होणार नाही. (Forbes New Deal)

Luminar Technologies ही एक प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह टेक कंपनी आहे

Luminar Technologies ही $2.1 अब्ज मार्केट कॅप असलेली एक प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह टेक कंपनी आहे. रसेल यांनी 2012 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी ही कंपनी स्थापन केली होती. यापूर्वी त्यांनी फोटोनिक्स आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्समध्ये काम केले होते. त्यांनी प्रगत लिडर तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे कार आणि ट्रक सारख्या अवजड वाहनांना अधिक सुरक्षित बनवते. रसेल यांच्या नावावर अशी 100 हून अधिक पेटंट आहेत. रस्ते अपघात सारख्या घटना कमी करणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

अमेरिकेतील सर्वात जुन्या मीडिया कंपन्यांपैकी एक फोर्ब्स

फोर्ब्स ही अमेरिकेतील सर्वात जुन्या मीडिया कंपन्यांपैकी एक आहे. या मीडिया कंपनीचे फोर्ब्स हे मासिक जगभरात 5 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचते. हे दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध करते. यासोबतच कंपनी सध्याच्या अब्जाधीशांची देखील सुधारित माहिती देण्याचे काम करते.

आम्ही ऑस्टिन रसेलचे स्वागत करतो : मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स

स्टीव्ह फोर्ब्स म्हणाले की, 'आम्ही ऑस्टिन रसेल यांचे स्वागत करतो. ते एक गतिमान उद्योजक आणि वैचारिक नेतृत्व आहे. ज्यांनी उद्योगातील आघाडीचे व्यवसाय तयार केले आहेत. फोर्ब्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , रसेल यांच्या नवनवीन संकल्पना मासिकाच्या अपेक्षित असलेल्या कामांमध्ये सुधारणा आणि चांगल्या प्रकारे बदल घडवून आणेल. यामुळे फोर्ब्स कंपनीची वाढ आणि विकास होण्यास मदत होईल. (Forbes)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT