Latest

World Test Championship Final : आयसीसी चॅम्पियनशिप फायनल ८ जूनला होणार?

अमृता चौगुले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलसंदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. 8 जून रोजी लंडनमधील द ओव्हल मैदानावर आयसीसी चॅम्पियनशिपची फायनल होण्याची शक्यता आहे. आंतररारष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने याची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही मॅच 8-12 जून दरम्यान होणार आहे. जर पाऊस झाला किंवा सामन्यात काही अडथळे आले तर यासाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. (World Test Championship Final)

जूनमध्ये फायनल मॅच होणार असल्याने यात आणि आयपीएलच्या सामन्यात पुरेसे अंतर देखील असेल. जर भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला तर खेळाडूंना याची तयारी करण्याची संधी मिळेल. पहिल्या चॅम्पियनशिपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (World Test Championship Final)


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT