Latest

Chandigarh University : ६० विद्यार्थिनींचा आंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला अटक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंदीगड विद्यापीठातील ६० विद्यार्थिनींचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला  आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी संशयित आरोपी विद्यार्थिनीला अटक केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी रात्री चंदीगड विद्यापीठाच्या (Chandigarh University)विद्यार्थ्यांनी मोहालीत निदर्शने केली. एका विद्यार्थिनीने वसतिगृहात आंघोळ करताना मुलींचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी  (Chandigarh University)) आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थिनीला अटक केली आहे. या बाबत मोहालीचे एसएसपी विवेक सोनी म्हणाले की, एका विद्यार्थिनीने हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केल्याचे प्रकरण आहे. या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. संशयित आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. आतापर्यंत आमच्या तपासात एकच व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. इतर कोणाचाही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाइल फोन ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत., असेही साेनी यांनी सांगितले.

दरम्यान, पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हरे यांनी आज (दि.१८) या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी माध्यमांना सांगितले की, ही बाब गंभीर असून, तपास सुरू आहे. मी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्वासन देते की, आरोपींना शिक्षा केली जाईल, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT