Latest

Thackeray vs Shelar : शरद पवारांच्या पत्रावरुन शेलारांची ठाकरे पिता-पुत्रावर निशाणा?

सोनाली जाधव

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. २) बारामती दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांची आणखी एक गुगली राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी या पत्रावरुन ठाकरे पिता-पुत्र यांच नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली!" (Thackeray vs Shelar)

Thackeray vs Shelar :  पेग, पेग्वीन, पार्टीसाठी कमला मिल बरी

भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,

"मा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मा. शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले, म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आलेय. याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण. मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा वारंवार हे परंपरा जतन करीत आले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्षे जतन करीत आली आहेत. फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली! त्यांचा नारा एकच.. मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ! पेग, पेग्वीन, पार्टीसाठी कमला मिल बरी!!"

या पोस्टमध्ये ठाकरे पिता-पुत्र अर्थात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव जरी घेतले नसले तरी अप्रत्यक्ष टोला लगावला असल्याचे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा होवू लागली आहे.

Sharad Pawar : काय आहे पत्रात

शरद पवार यांनी यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात, शनिवारी आपण बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच यादिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.

आपण मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. मंत्रिमंडळातील
मेळाव्यानंतर सहकाऱ्यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत शरद पवार यांच्याकडून फडणवीस व अजित पवार यांनाही देण्यात आली आहे. त्यांच्या या नव्या गुगलीमुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे निमंत्रण स्वीकारतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT