Nipani car accident ; देवदर्शनाला जाताना कारचा गुडस गावाजवळ अपघात; कुटुंबातील ९ जण जखमी | पुढारी

Nipani car accident ; देवदर्शनाला जाताना कारचा गुडस गावाजवळ अपघात; कुटुंबातील ९ जण जखमी

निपाणी : पुढारी वृत्तसेवा संकेश्वर-गोकाक मार्गावर हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुडस गावाजवळ सौंदती येथे देव दर्शनासाठी निघालेले स्कार्पिओ वाहन चालकाचा ताबा सुटून फर्निचर दुकानात घुसून पलटी झाले. या अपघातात एकाच कुटुंबातील ९ जण जखमी झाले. हा अपघात आज (शुक्रवार) पहाटे झाला. अपघातातील जखमी हे चाकण (पुणे) येथील रहिवाशी आहेत. जखमींवर हुक्केरी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद हुक्केरी पोलिस स्‍टेशनमध्ये झाली आहे. दरम्यान अपघातग्रस्त वाहनाचे मोठे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाकण (पुणे) येथील रहिवासी रामदास दौंडकर हे आपल्या कुटुंबीयांसह सौंदती येथे देवदर्शनाला जात होते. त्यांचे स्कार्पिओ वाहन गुडसजवळ आले असता चालक जीवन दौंडकर यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्त्यावर येऊन पलटी झाले. यामध्ये रामदास तोडकर जीवन दौंडकर यांच्यासह अन्य सातजण जखमी झाले.

जखमींना तातडीने हुक्केरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी हुक्केरी पोलीस ठाण्याचे सीपीआय जयंत गवळी यांनी भेट देऊन पाहणी केली. या अपघातामुळे संकेश्वर,गोकाक मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button