Latest

अपात्र आमदार प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : अनिल परब

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावरील अंतिम निकालानंतर ठाकरे गटाची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. आज ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती दिली. दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिली.

बुधवारी (दि, १०) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचा आणि सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. आज आमदार अनिल परब यांनी आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे सांगितले.

परब यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय डावलले आहेत. त्यांनी कायद्याची चौकट पायदळी तुडवली आहे. त्यामुळे याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. न्यायालय आम्हाला न्याय देईल असा विश्वास परब यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT