शिवसेना शिंदे गटाचीच, अखेर सत्याचाच विजय : आमदार भरत गोगावले | पुढारी

शिवसेना शिंदे गटाचीच, अखेर सत्याचाच विजय : आमदार भरत गोगावले

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या अपात्रते संदर्भात बुधवारी (दि. १०) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असल्याचे सांगून ठाकरे गटाच्या 16 आमदारांविरोधात काय कारवाई करायची याबाबत येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी आज (दि. ११)  महाड येथे केले.

महाड व पोलादपूरमध्ये शेकडो शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार भरत गोगावले यांनी आपण या निर्णयापूर्वीच येणारा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल व त्याचे आम्ही स्वागत करू असे सांगितल्याची आठवण करुन दिली. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय सत्याच्या बाजूने दिला असल्याचे मत व्यक्त त्याचे आपण विनम्र भावनेने स्वागत करतो असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 16 आमदारांविरोधात कोणता निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री व इतर संबंधितांशी बोलणे केल्यानंतर ठरविले जाईल असे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाकडून कालच्या निर्णयाचा झालेला निषेध म्हणजे आता त्यांना कोणतीही कामे राहिली नसल्याचे दाखवून देणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या हातच पाहिजेत व पेढे वाटून शिवसैनिक व महिला आघाडीने त्यांचे स्वागत केले. विधानसभा अध्यक्षांकडून आमदार गोगावले यांच्या व्हीपचे समर्थन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, शहप्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे ,सिद्धेश पाटेकर, दीपक सावंत, माजी सभापती सौ सपना मालुसरे, जितू सावंत, नितीन आरते, यांसह महिला आघाडी प्रमुख विद्यादेसाई व शहरासह तालुक्यातील महिला आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Back to top button