Latest

Moye Moye Song ला मिळाले 57 मिलियनहून अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलं का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सगळीकडे मोये मोये या गाण्याची धूम पाहायला मिळत आहेत. अनेक इन्स्टा स्टार्स रिल्स आणि पोस्टच्या बॅकग्राऊंडला हेच गाणे लावत आहेत. या गाण्याला तब्बल ५७ मिलियन व्ह्युज पाहायला मिळत आहे. (Teya Dora Moye Moye Song) काही महिन्यांपूर्वी 'मोये मोये' (Moye Moye) हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणे इतके गाजले आहे की, प्रत्येकाला या गाण्याची भूरळ आहे. युट्यूबवर या गाण्याला ५७ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळले आहेत. (Teya Dora Moye Moye Song)

"डेजनम' असे या गाण्याचे टायटल असून २ मिनिटे ५७ सेकंद गाण्याची वेळ आहे. बघता बघता हे गाणं धुमाकूळ घालत आहे. गायिका तेया डोराने हे गाणं गायलं आहे. या गाण्यात तेयाची झलकही दिसतेय. हे गाणे सर्बियाई रॅपर स्लोबोदान वेल्कोविक कोबीने लिहिले आहेत.

कोण आहे तेया डोरा? 

तेया डोरा सर्बियन गायिका आहे. तिचे नाव टेओडोरा पावलोवस्का असं आहे. पण तिला तेया डोरा नावाने ओळखतात. तिने अनेक हिट गाणीगायली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT