Latest

Tesla in India: ‘Tesla’ची भारतातील एन्ट्री कन्फर्म; एलन मस्क काय म्हणाले?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या टेस्ला (Tesla) उत्पादनाची भारतात येण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. दरम्यान भारतात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देणे ही टेस्लासाठी नैसर्गिक प्रगती असल्याचे म्हणत, मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत. सोशल मीडिया कंपनी एक्स आणि टेस्ला  या दोन्ही कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांच्या वक्तव्यादरम्यान टेस्लाची भारतातील एन्ट्री कन्फर्म होणार असल्याचे म्हटले आहे. (Tesla in India)

टेस्लाची टीम एप्रिलच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आलेआहे. ही टीम आपल्या प्रस्तावित प्लांटसाठी योग्य जागा शोधण्यासाठी अनेक राज्यांना भेट देणार आहे. आता एलन मस्क यांनी टेस्लाच्या भारतात प्रवेशाची जवळपास पुष्टी केली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देणे ही टेस्लासाठी नैसर्गिक प्रगती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा संबंध टेस्लाच्या भारत कारखान्याशी जोडला जात आहे. (Tesla in India)

टेस्लाला EV उत्पादनात करायचीय मोठी गुंतवणूक

एलन मस्क यांना भारतात ईलेक्ट्रॉनिक व्हेईकल उत्पादनात २ ते ३ अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक करायची आहे. भारत सरकारचे नवीन ईव्ही धोरण लागू झाल्यानंतर टेस्लाच्या प्रवेशाबाबत अटकळ सुरू झाली. नवीन धोरणात सरकारने देशातील उत्पादनात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सूट दिली आहे. यामुळे देशातील औद्योगिक उत्पादन तर वाढेलच शिवाय नवीन रोजगारही निर्माण होतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Tesla in India: टेस्लाला अनेक राज्यांमधून ऑफर्स

एएनआयने सूत्रांचा हवाला देत दावा केला होता की, महाराष्ट्र आणि गुजरातने टेस्लाला आपापल्या राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी जमिनीवर खास ऑफर दिल्या आहेत. याशिवाय तेलंगणा सरकार येथे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणण्यासाठी गंभीर चर्चा करत आहे. टेस्लाची टीम गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांना भेट देऊ शकते, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.