Latest

तिस्ता सेटलवाड यांचा अंतरिम जामीन 19 जुलैपर्यंत वाढला

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा: गुजरात दंगलीनंतर निर्दोष लोकांना या प्रकरणात अडकविण्यासाठी खोटे पुरावे जमा करण्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकत्या तिस्ता सेटलवाड यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने 19 जुलैपर्यंत वाढविला आहे. दरम्यान सदर प्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने जामीन अर्ज रद्दबातल केल्यानंतर सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, यावर न्यायालयाने सेटलवाड यांना अंतरिम जामीन दिला होता. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे 15 जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बनावट पुरावे जमा करण्याच्या प्रकरणात अहमदाबाद पोलिसांनी गतवर्षीच्या जून महिन्यात सेटलवाड यांच्यासह गुजरातचे तत्कालीन पोलिस महासंचालक आर. बी. श्रीकुमार तसेच तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट यांना ताब्यात घेतले होते.

त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने सेटलवाड यांच्या जामीनअर्जाची दखल घेत राज्य सरकारला नोटीस जारी केली होती. मात्र सेटलवाड यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT