पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Semi Final Match : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा न्यूझीलंडनंतरचा दुसरा संघ ठरला. ग्रुप-1 च्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडचे 7-7 गुण झाले. तर दुरीकडे रविवारी सकाळी झालेल्या सामन्यात नेदरलँड संघाने द. आफ्रिकेचा पराभव करून वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा उलटफेर केला आहे. या पराभवासह द. आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे त्याचा फायदा भारतीय संघाला झाला असून. रोहित ब्रिगेडने 6 गुणांसह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पुढचा सामना इंग्लंड विरुद्ध असणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) हा सामना खेळवला जाणार आहे.
न्यूझीलंडने चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर ग्रुप 2 मध्ये पहिले स्थान पटकावले. त्यामुळे इंग्लंड दुस-या क्रमांकावर आला आहे. भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर तो बाद फेरीचा सामना कोणत्या संघासोबत खेळणार? तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. रविवारी सकाळी झलेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड संघाने द. आफ्रिकाचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचणारा तिसरा संघ ठरला आहे. त्यातच रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवला, तर त्यांचा सामना निश्चितपणे इंग्लंडशी होईल कारण गट 2 मधील अव्वल संघ गट 1 मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या अपसेटचा बळी ठरली, तर समीकरणे थोडी गुंतागुंतीची होतील.
जर भारताने आज झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंडशी होईल आणि हरल्यास त्यांना न्यूझीलंडशी सामना करावा लागेल. या टी 20 विश्वचषकात इंग्लंडचा आयर्लंडकडून पराभव, झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा पराभव आणि आता दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडकडून पराभव यासह अनेक अपसेट पाहायला मिळाले.
गट-2 मधील पहिला सामना रविवारी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात झाला. यात मोठा उलटफेर झाला. नेदरलँडने द. आफ्रिकेचा अवघ्या 13 धावांनी पराभव करून द. आफ्रिकेला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचवेळी, दिवसाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगला आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला 6 गुण मिळतील आणि ते सेमी फायनल गाठतील.