Latest

IND vs ZIM : टीम इंडियाचा ‘काला चष्मा’वर भन्नाट डान्स, पहा VIDEO

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झिंबाब्वेचा 3-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय संघाने चांगलीच धमाल केली. शिखर धवनसह संघातील अनेक युवा खेळाडू काला चष्मा गाण्यांवर नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सर्व खेळाडू विजयानंतर जल्लोष करताना दिसत आहेत. (IND vs ZIM)

या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला 'प्लेयर ऑफ द सीरीज' पुरस्कार देण्यात आला. शुभमन गिलने केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकमुळे भारताने 289 धावांचे आव्हान विरोधी संघासमोर ठेवले होते. आव्हानाचे पाठलाग करताना झिंबाब्वेचे सिकंदर रझा आणि शॉन विल्यम्स यांनी चांगली फलंदाजी केली. उर्वरित फलंदाजांना भारतीय गोलंजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे फार काळ फलंदाजी करता आली नाही. यावेळी अक्षर पटेल (30 धावांत 2 बळी), कुलदीप यादव (38 धावांत 2 बळी) आणि दीपक चहर (75 धावांत 2 बळी) 49.3 षटकांत 276 धावांत गारद झाला. (IND vs ZIM)

सिकंदर रझा (95 चेंडूत 115 धावा, नऊ चौकार, तीन षटकार) आणि ब्रॅड इव्हान्स (28) यांनी आठव्या विकेटसाठी 104 धावा जोडून विजयाची आशा निर्माण केली पण, संघाने शेवटच्या तीन विकेट केवळ तीन धावांत गमावल्या. शॉन विल्यम्सनेही (46 चेंडूत 45) उपयुक्त खेळी खेळली. झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा हा सलग 15 वा विजय आहे. 3 जून 2010 रोजी भारताने झिम्बाब्वेविरुद्ध एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. भारताकडून फलंदाजी करताना गिलने 97 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 130 धावा केल्या. याशिवाय इशान किशन (61 चेंडूत 50 धावा, सहा चौकार) याने तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी करून भारताने 8 बाद 289 धावा केल्या.

SCROLL FOR NEXT