Latest

Tamilnadu Flood Update : तामिळनाडूत पुराचा हाहाकार;  ६९६ गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरुनेलवेली (तामिळनाडू) [भारत], 22 डिसेंबर (एएनआय): दक्षिण तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे, जिल्हा प्रशासनाने 696 गर्भवती महिलांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवले. खबरदारीचा उपाय म्हणून हे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत तब्बल 142 गरोदर महिलांना विविध रुग्णालयात दाखल करून बाळंतपण करण्यात आले. दरम्यान, दक्षिण जिल्ह्यातील पूर आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने तिरुनेलवेलीलाही भेट दिली.

तमिळनाडूत अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुराशी संबंधित विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटना झाल्या आहेत.  गेल्या चार दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे. (Tamilnadu Flood Update) त्याचबरोबर रेल्वेलाही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकार आणि केंद्राने संयुक्तपणे बाधित लोकांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात बचाव आणि मदत मोहीम राबवली आहे. थुथुकुडी पूरस्थितीबाबत तामिळनाडूचे वाहतूक मंत्री शिवशंकर एसएस म्हणाले की, राज्य सार्वजनिक वाहतूक 3 दिवसांत पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT