Latest

Tamil Nadu: उटीत जुनी इमारत कोसळली; ८ कामगार ढिगाऱ्यात अडकले

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू राज्यातील उटी येथील लव्हडाळे परिसरात बांधकाम सुरू असताना जुन्या इमारतीचा काही भाग आज (दि.७) कोसळला. यात ८ बांधकाम कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. तर दोन गंभीर जखमी कामगारांना उटी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. तीन कामगारांची सुटका करण्यात आली आहे. लव्हडेल येथे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याने आठ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत होते. यावेळी इमारतीचा एक भाग कोसळला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT