Latest

Senthil Balaji arrest : तामिळनाडूचे मंत्री बालाजी यांना २८ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले तामिळनाडीचे वीज मंत्री सेंथिल बालाजी यांना २८ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तामिळनाडूचे वीज मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या अटकेवर निषेध व्यक्त केला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी डीएमके नेते आणि तामिळनाडू सरकारमधील वीज आणि अबकारी खात्याचे मंत्री सेंथिल बालाजी (State minister Senthil Balaji) यांच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी करत त्यांनी रात्री उशिरा अटक केली होती. तब्बल १८ तास त्यांची चौकशी केल्यानंतर ईडीने सेंथिल यांना अटक केली.

या कारवाईदरम्यान सेंथिल बालाजी यांनी त्यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेंथिल बालाजी यांची आज सकाळी कोरोनरी अँजिओग्राम चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लवकरात लवकर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला चेन्नईतील तामिळनाडू सरकारी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने दिला आहे. (Senthil Balaji arrest)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT