Latest

Talathi Exam : गरीबाच्या पोरांनी कुठून आणायचे पैसे; तलाठी भरती परीक्षेवरुन वडेट्टीवारांचा निशाणा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी  नाशिक आणि नागपूर जिह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या. आजही (दि.२१) महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने लाखो परीक्षार्थी खोळंबले. (Talathi Exam) या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, "सरकराला लाज वाटत नाही का; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही" असं म्हणत सरकारवर निशाणा साधला.

राज्यातील परीक्षेमध्ये होणारे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे, पेपरफुटी प्रकरणामुळे तलाठी परीक्षा जिल्हा प्रशासकीय पातळीवरून संबंधित प्रक्रिया थेट जमाबंदी आयुक्तांच्या समन्वयाने घेण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार चार हजार 466 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, राज्यभरातून तब्बल 11 लाख अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 10 लाख 30 हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले असून, एकाचवेळी परीक्षा घेण्याचे नियोजन, परीक्षा केंद्र आणि आसन व्यवस्था, सुरक्षितता आणि इतर नियोजनाबाबत पूर्ण तयारी करत 17 सप्टेंबरपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली आहे.

Talathi Exam : परिक्षा केंद्रावर गोंधळ

आज महाराष्ट्रात अमरावती, नागपुर, लातुर, अकोला आदी तलाठी परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने परिक्षा केंद्रावर गोंधळ सुरु झाला आणि विद्यार्थी संभ्रमात पडले. सर्व्हर डाऊन झाल्यावे विद्यार्थ्यांमध्ये मनस्तपा व्यक्त केला जात आहे.  धुळ्यात परिक्षा दिडसातानंतर सुरु झाली. सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी खोळंबली. त्यामुळे अद्यापही परीक्षा केंद्राबाहेरच होते.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत तलाठी परीक्षा गोंधळ स्थितीसंबधित  सरकरावर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षेसाठी लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज प्रचंड मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांकडून परीक्षेच्या नावावर सरकारने १००० रुपये शुल्क आकारणी करायची, दूरचे परीक्षा केंद्र द्यायचे आणि वरून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल असे व्यवस्थापन करायचे हा धंदाच या सरकारने सुरू केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही ही बाब आता विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना स्पष्ट झाली आहे."

गरीबाच्या पोरांनी कुठून आणायचे पैसे

वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की,"आज तलाठी परीक्षा होत आहे. अनेक परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थी परिक्षा केंद्राबाहेर ताटकळत आहेत. सकाळी ७.३० ला या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले पण १० वाजले तरीही परिक्षेला सुरुवात झालेली नव्हती. एकीकडे विद्यार्थ्यांकडुन १००० रु. घ्यायचे आणि राज्यात या भरतीसाठी चारच केंद्र उभा करायची. यामुळे  विद्यार्थ्यांना प्रचंड पायपीट सहन करावी लागत आहे. नागपूरच्या सेंटरवर लातूर, जालन्यापासून मुलं आली आहेत. सकाळी परिक्षेचं रिपोर्टींग होत. काल आलेली मुलं त्यांची खायची, राहायची, झोपायची सोय नाही. गरीबांची, शेतकऱ्यांची मुलं, काम करणाऱ्यांची मुलं नोकरीच्या आशेने येतात आणि त्यांच्या भावनेशी अस खेळलं जात. या सरकारला लाज वाटायला हवी होती, कशाला चार सेंटर द्यायची. जिल्ह्यानुसार परिक्षा घेतली असती तर असा गोंधळ निर्माण झाला नसता. विद्यार्थ्यांकडून हजारो पैसे घेवुन नेमके कोणाच्या खात्यात जातात हे पैसे. गरीबाच्या पोरांनी प्रवासाला कुठून आणायचे आहेत. ज्यांनी प्रवासखर्चासाठी अर्ज केला आहे त्यांचा प्रवास खर्च सरकराने द्यावा. राज्यात तमाशा सुरु आहे.  जर या नैराश्यातून कोणा विद्यार्थ्य़ाने आपलं बर वाईट केलं तर याला सरकार जबाबदार असेल."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT