Latest

Raj Thackeray : निवडणूक कामांना शिक्षक, ५ वर्षे निवडणूक आयोग काय करतोय?: राज ठाकरे संतापले

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन परीक्षांच्या काळात शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले जात आहे. निवडणुकीची सगळी कामे शिक्षकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोग स्वत:ची यंत्रणा का उभी करत नाही ? निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही ? असा सवाल करून आयोगावर कडक कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.१९) पत्रकार परिषदेत केली. Raj Thackeray

निवडणुकीतील अतिरिक्त कामांबाबत राज्यातील शिक्षक संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली. Raj Thackeray

राज ठाकरे म्हणाले की, तीन- तीन महिने शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवून ठेवल्यास मग मुलांना शिकवणार कोण ? निवडणूक आयोगाला किती माणसे लागतात, केव्हा माणसे लागतात आणि कशाला माणसे लागतात, याची माहिती पाहिजे. परंतु आयोग पाच वर्षे झोपा काढतो, आणि निवडणुकीच्या तोंडावर जागा होतो. आयोगाचे पाच वर्षे काम काय असते ?, याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. तसेच निवडणूक आयुक्तांशीही चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांवर सगळी कामे ढकलून मोकळे होणाऱ्या आयोगावर शिस्तभंगाची कारवाई कोण करतंय तेच बघू , असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT