Latest

T20 World Cup : पुढच्या वेळी खराखुरा मिस्टर बीन पाठवा! विजयानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही उडवली पाकची खिल्ली! वाचा काय आहे मिस्टर बीन प्रकरण

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : T20 World Cup : पुढच्या वेळी खराखुरा मिस्टर बिन पाठवा! असे ट्विट करत चक्क झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींना देखिल पाकिस्तानची खिल्ली उडवण्याचा मोह आवरला नाही. त्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखिल रिप्लाय केला की झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनी ही चांगली खेळी केली.

T20 World Cup : सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान काल झिम्बाब्वेने पाकिस्तानवर 1 धावाने चकित करणारा विजय मिळवला. त्याचा जल्लोष झिम्बाब्वेकडून साजरा केला जात आहे. पण पाकिस्तानने नकली मिस्टर बीनला झिम्बाब्वेच्या एका कार्यक्रमात पाठवले होते. त्याचा रागही यातून व्यक्त होत आहे. मॅचच्या आधीपासूनच ट्विटरवर झिम्बाब्वे-पाक यांच्यात मिस्टर बीनवरून ट्विटर वॉर सुरू होते. नकली मिस्टर बीन पाठवल्याबद्दल झिम्बाब्वेच्या नागरिकांचा पाकिस्तानवर मोठा राग होता. तो त्यांनी यातून व्यक्त केला. त्यातच झिम्बाब्वेच्या विजयानंतर नागरिकांकडून पाकिस्तानची मोठी खिल्ली उडवण्यात येत आहे.

T20 World Cup : विशेष म्हणजे झिम्बाब्वेचे राष्ट्रपती Emmerson Mnangagwa यांना देखिल मिस्टर बीनवरून पाकिस्तानला डिवचण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे वाह! काय विजय आहे हा झिम्बाब्वेसाठी. पुढच्या वेळी खराखु-या मिस्टर बिनला पाठवा!

यावर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखिल प्रतिक्रिया देत पाकिस्तानची खिल्ली उडवली. वीरू म्हणाला, 'राष्ट्रपतीभी मस्त खेल गए, पाकिस्तान की दुखती रग हा-हा-हा!'

T20 World Cup : काय आहे मिस्टर बीन वाद

पीसीबीच्या ट्विटवरून वाद सुरू होतो. पीसीबीने ट्विटरवर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत ज्यात पाकिस्तान संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट करताना झिम्बाब्वेच्या एका क्रिकेट चाहत्याने लिहिले की, आमच्या देशाचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही एकदा खऱ्या ऐवजी बनावट पाकिस्तानी मिस्टर बीन दाखवला होता.
हा वाद आपण मैदानावर पाहणार आहोत. उद्या पाऊस तुम्हाला वाचवेल अशी प्रार्थना करा. हा संपूर्ण वाद 6 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. 2016 मध्ये हरारे कृषी कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानने बनावट मिस्टर बीन बनवून एका कलाकाराला झिम्बाब्वेला पाठवले होते. बनावट मिस्टर बीन बनवून पाकिस्तानात पाठवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असीम मोहम्मद असे होते. जो मिस्टर बीनसारखा दिसत होता. त्याच वेळी, पाकिस्तानच्या या बनावट बीन शोसाठी $ 10 फी देखील आकारण्यात आली होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT